Posts

Showing posts from January, 2021

आजच्या युगातील एक सत्य

Image
एकेकाळी दहाड मारूनी गर्जत असे जो, उगीच छेडत असणार्‍याला पंजा मारी तो त्रास त्याला देण्यासाठी कोणी धजावत नव्हता, धजावला जर कोणी तर तो त्याला सोडत नव्हता हळूहळू मग विजय मिळविला त्याने रागावरती, वाद ना घाले कोणाशी ना ओरडे कोणावरती एकेदिवशी एकाने केली मग मोठी हुशारी, वाद घातला त्याच्याशी अन् केली आरे कारी शांतपणाने याला त्याने केले पहिले दुर्लक्ष, तरीही छेडत राहिला अन् हा झाला त्याचेच भक्ष्य रूद्राचा अवतार तो झाला होता लोण्याचा गोळा, आता मात्र त्यातूनी ऊठू लागल्या अग्नीच्या ज्वाळा याला त्याच्या या अवताराची जाणीव मुळीच नव्हती, मागू लागला माफी धडधड करू लागली छाती आता मात्र त्यास उमजली दुनियेची रीत ही न्यारी, शांत माणसा जगू न देती घाबरती रूद्राला सारी नाईलाजाने त्याने मग जुने रूपच अवलंबिले, रीत अशी ही दुनियेची तिने चांगले होऊ न दिले... ✒ K. Satish

संविधान

Image
आमच्या देशाची शान आमचे संविधान महान, सार्‍या ग्रंथाहूनी श्रेष्ठ आम्हा हा ग्रंथ महान वेशभूषा, प्रांत, भाषा विविधता इथे किती, तरीही एकसंघ होऊनी इथे सर्व नांदती सर्वांना एकरूप बनवले या ग्रंथाने, जरीही असले भिन्न सगळे जाती आणि पंथाने स्वातंत्र्य लिहिण्याचे स्वातंत्र्य बोलण्याचे, स्वातंत्र्य हसण्याचे मुक्तपणे जगण्याचे भिन्न भिन्न ग्रंथ इथे तरीही देश एक हा, कारण हा ग्रंथ जपतो सार्‍यांच्या भावना स्त्रियांना हक्क देई पीडितांना न्याय देई, रंजल्या गांजलेल्यांच्या हाताला काम देई दुष्टांना शासन इथे हक्कांसाठी भाषण इथे, गरीबांना राशन इथे कारण संविधान इथे भाग्यवान आहोत आम्ही या पृथ्वीतलावरी, या महान ग्रंथाचे राज्य या देशावरी हित यात जनतेचे राज्य इथे जनतेचे, शिवरायांच्या मनातील स्वराज्य इथे समतेचे यामुळेच इथे आता नाही कोणीही गुलाम, करूनी वंदन तयाला करूया सगळे सलाम...!!! ✒ K. Satish

सौंदर्याची खाण

Image
नाजूक या ओठांची लाली नयन नशीले गाल गुलाबी, पहात रहावे रूप तुझे अन् मद्य न पिता व्हावे शराबी थरथरल्या ओठांवर तुझिया फूल गुलाबाचे ठेवावे, अन् उचलावे अलगद आणिक हळूच त्याला मग चुंबावे कशी करू मी स्तुती तुझी मी कधी अप्सरा पाहिली नाही, पाहतो जेव्हा स्वप्नी अप्सरा तुजविन दुसरी दिसतच नाही सौंदर्याची खाण तू प्रिये तुझी आस लागे ह्या जीवाला, आशिक झालो तुझा आता मी दे तू दुजोरा माझ्या प्रेमाला ✒ K.Satish

इंद्रायणी

Image
तुम्ही करू नका घाण आपली इंद्रायणी छान हिच्या चोहीकडे संतांचे स्थान एके काळी होती निर्मळ किती इंद्रायणी आपली स्वार्थापोटी माणसाच्या तिची काय दशा झाली दुर्गंधी रसायन, सांडपाणी केरकचरा यांचा का हो केला इतका इंद्रायणीवरती मारा संतांच्या भूमीत वारकर्‍यांचा हो मान त्यांना मिळत नाही आता इंद्रायणीमध्ये स्नान आता अखेरची घटका मोजत आहे इंद्रायणी तिला वाचवण्याचा ध्यास तुम्ही घ्या हो तुमच्या मनी सगळे मिळूनच आपण आता निर्धार करूया श्रमदानाने हो आपण तिला निर्मळ करूया...!!! ✒ K. Satish

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

Image
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ निवडणुकीची आता लगबग झाली सुरू कार्यकर्ते दारोदार लागले बघा फिरू, घरोघरी जाऊनी, नतमस्तक होऊनी भेटवस्तू देण्याची घाई लागले करू खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ जे कधीही बघत नव्हते ज्यांच्या तोंडाकडे ते आता नमस्कार त्यांना करू लागले, पत्रकांचा खच पडला सगळ्यांच्या दारात पदयात्रांचा सपाटा सुरू झाला जोरात खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ आयोजन हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचे इथेतिथे जागोजागी आता दिसू लागले, दर रोज जेवणाचे आमंत्रण देऊनी जनतेच्या पोटात अन्न ठासू लागले खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ मद्याच्या पार्ट्या अन् नृत्याचे फेरे सुरू झाले कुमार्गाचे प्रकार सारे, वादा वादीचे प्रकार घडू लागले कार्यकर्ते आपा पसात भिडू लागले खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ मतदानाची तारीख जवळ येऊ लागली पैशाच्या पावसात जनता न्हावू लागली, घरोघरी जाऊन पैसे हाती देऊन लोकशाहीची विटंबना होऊ लागली खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ खुर्चीचा खेळ...

व्यभिचाराने केला घात

Image
चेकाळलेले म्हातारपण बिघडलेली तरूणाई, सुंदरी पाहून तो ही भुलला तिलाही भान उरले नाही चाळीशी उलटून गेल्यानंतर दिसली त्याला ती सुंदरी, हसून बोलली त्याला तर ती धडधड झाले त्याच्या उरी ओळखूनी त्याच्या भावना तिनेही जाळे फेकले प्रेमाचे, अडकूनी त्या जाळ्यामध्ये त्याने उचलले पाऊल टोकाचे ताबा सुटला मनावरीचा व्यभिचाराने नको ते घडले, क्षणिक सुखाच्या मोहापायी नसते लफडे गळ्यात पडले पैसा गेला, प्रतिष्ठा गेली सोडूनी त्याला पत्नीही गेली, सुखमय आयुष्याची त्याच्या पुरती राखरांगोळी झाली सुंदरीनेही सोडले त्याला तिने नवा संसार थाटला, खंगून गेला पुरता त्याला मार्ग मरणाचा बरा वाटला भाव भावनांवरती आहे जीवन सार्‍यांचे वसलेले, पण वाहवत गेलेले अनेकजण पाहिले मी ही फसलेले ✒ K. Satish

मोहमाया

Image
असंख्य प्राणी अवतरले विश्वामध्ये स्थिरावले, मोहमायेच्या दुष्टचक्राने नकळत त्यांना खुणावले कुणी धनाचा, कुणी तनाचा कुणी खाण्याचा, मोह बाळगला, मनुष्य प्राणी असा निराळा स्वार्थ ज्यामध्ये अति बळावला मौजमजा अन् थाटापायी पैसा अन् व्यभिचारापायी, चोरी करूनी, जीव घेऊनी वाममार्गाला नकळत जाई नाते गोते क्षुल्लक झाले पैशाला खूप महत्त्व आले, प्राॅपर्टीच्या वादापायी कित्येक नाती संपून गेले समाधानी ठेवून मनाला ध्यास नसावा स्वार्थाचा, जन्म मिळाला पृथ्वीतलावर आनंद घ्यावा जगण्याचा..... ✒ K. Satish