Posts

Showing posts from June, 2021

गरज एकजुटीची

Image
एकेदिवशी रात्रीच्या समयी फेरफटका मारीत असता, नजरेस पडला चोहीकडे खोदून ठेवलेला तो रस्ता पहाता पहाता खिन्न मनाने विचार माझ्या मनात आला, आत्ताच बांधलेल्या रस्त्याचा लगेचच असा अंत का केला ? रस्ते बांधणे आणि खोदणे प्रशासनाचा खेळ निराळा, कर्तव्यशून्य अधिकार्‍यांना हव्या फक्त पैशांच्या माळा कंत्राटदार अन् नेत्यांची ही खेळी आता जुनी जाहली, स्वतंत्र भारताची दुर्दशा आपल्याच राजकारण्यांनी केली अन्यायाशी लढणार्‍यांचे या देशातील प्रमाण घटले, त्यामुळेच भ्रष्टाचार्‍यांनी आजवर या देशाला लुटले आपल्या पैशाचा हा अपव्यय उघड्या डोळ्यांनी पाहूनी, जगत राहते जनता सारी रक्ताचे आसू पिऊनी एकजुटीची ताकद आता दाखवण्याची गरज भासते, षंढासारखे जीवन जगणे हे तर मरण्यासमान असते... ✒ K. Satish

संगीत

Image
जीवनाचा ध्यास संगीत या देहातील श्वास संगीत पृथ्वीतलावर जाणवणार्‍या स्वर्गसुखाचा आभास संगीत भुकेल्याचा घास संगीत तहानलेल्याची प्यास संगीत भगवंताच्या भक्तांसाठी  ईश्वराचा सहवास संगीत मराठमोळ्या मावळ्यांकरिता छत्रपती शिवराय संगीत मायेसाठी आसुसलेल्यांची प्रेमळ अशी माय संगीत सीमेवरील जवानांसाठी देशाचा अभिमान संगीत मातृभूमीच्या रक्षणाकरिता शहीद होण्याचा सन्मान संगीत लावण्यवतीला लाजवेल अशी सौंदर्याची खाण संगीत पृथ्वीतलावर आनंदाने जगण्यासाठी वरदान संगीत पृथ्वीला जर देह मानले तर तिच्यातील प्राण संगीत उच्च नीचचा भेद मिटवी जगी श्रेष्ठ असे महान संगीत जाता जाता एकच म्हणणे आमुचा प्रत्येक श्वास संगीत उरलेल्या ह्या आयुष्याला उरला एकच ध्यास संगीत ✒ K. Satish

बाप

Image
बाप नावाचे विशाल वृक्ष आयुष्यात असावे, त्याच्या छायेत जीवन आपुले आनंदाने वसावे  रागीट, तापट, हुकूमशहा तो वाटे कधी सर्वांना, परंतु त्यामागील प्रेमभाव ना दिसे इतरांना  ढाल होऊनी रक्षण करतो कुटुंबासाठी अविरत लढतो, अश्रू कुणाला न दाखवता एकटाच गपचूप तो रडतो  मोठ्या मोठ्या वादळामध्ये ना डगमगता लढतो, योग्य दिशा दावूनी आपुल्या मुलांचे भविष्य घडवतो  मुलीसाठी तर काळीज त्याचे तुटते क्षणाक्षणाला, बाप या शब्दाविना किंचितही अर्थ नसे जीवनाला ✒ K. Satish

जीवनगाणे

Image
गाणे जीवनाचे ऐटीत गात आहे, सूर बिघडले तरीही आनंद घेत आहे  बेसूर झाले गाणे म्हणून का रडावे, सूर पुन्हा जुळवूनी हर्षाने गुणगुणावे  चुकलेल्या त्या सूरांना नीट ओळखूनी घ्यावे, पुन्हा ना चुकावे हे सूत्र मग जपावे  मैफिल रंगवूनी हे गीत गुणगुणावे, असे व्हावे गाणे जग मंत्रमुग्ध व्हावे  सूर चुकले म्हणून का मधेच संपवावे ?, हे गीत खूप अमूल्य संपूर्ण गुणगुणावे ✒ K. Satish

काळाची आली सत्ता

Image
काय बघा परिस्थिती आली सारी दुनिया हतबल झाली, मृत्यूने थैमान मांडले काळाची हो सत्ता आली आज जो दिसला, हसला बोलला उद्या अचानक संपून गेला, काय चालले कळेचना मज जीव का इतका स्वस्त हो झाला वयाची ती मर्यादा संपली तरूणाई मृत्यूने जखडली, आधारस्तंभ होती जी मंडळी आधार सोडूनी निघून हो गेली आयुष्य झिजवूनी कमावलेले सत्ता, प्रसिद्धी, पैसा अडका, उपभोगाविन इथेच राहिले झिजणार्‍यांना असे हा धक्का नाही भरवसा या जीवाचा क्षण आनंदी उपभोगावे, प्रफुल्लित ठेवूनी मनाला मरण्याआधी जगूनी घ्यावे ✒ K. Satish

दुनियेची रीत

Image
अश्रूंच्या थारोळ्यामध्ये पडलो होतो जेव्हा, विव्हळत होतो, तडफत होतो कुणी न होते तेव्हा सावरून मग स्वतःला मी घेतली ऊंच भरारी, कौतुक माझे करावयाला आली दुनिया सारी आयुष्यातील एक सत्य मी जवळून पाहिले आहे, माणसांची दुहेरी भूमिका मी अनुभवली आहे ऐश्वर्याच्या शिखरावर असताना होते चिकटून, अपयशाच्या खाईत पडल्यावर वागले सगळे फटकून ओळखून मग रीत जगाची बदलले मी स्वतःला, मार्ग बदलला जगण्याचा अन् खचू न दिले मनाला सुप्त गुण मग स्वतःमधले मला कळू लागले, यशप्राप्तीचे नवे सूत्र आपोआप जुळू लागले परिस्थितीने मला शिकवली या दुनियेची रीत, म्हणून आता संकटांना मी कधीच नाही भीत... ✒ K. Satish

जवळचेच कातील

Image
आघात सोसूनी मी झालो किती कठोरं, हळव्या मृदू मनाचा बदलूनी गेला नूरं पाहून व्यथा कुणाची मना आघात होई, मन पिळवटूनी जाई डोळ्यातं पाणी येई जवळचे जे म्हणवती त्यांनीच केला घातं, साधूनी स्वार्थ सगळा घेतला धुऊनी हातं आघात खूप मोठा तो माझ्यासाठी होता, प्रत्येक तो लुटणारा माझ्याच निकटचा होता होता कोणी मित्र कुणी नात्यातील होता, दूरचे कुणीच नव्हते जवळचे ते कातीलं दगाबाज तुम्हा समजत नाहीत लवकर, कीड असते चिटकूनी झाडालाच निरंतर स्वार्थी जगातं आता सर्वांनी शहाणे व्हावे, वेळीच पोखरणार्‍या कीडीला ओळखावे ✒ K. Satish

अपेक्षांचे ओझे

Image
अपेक्षांचे ओझे कोणाकोणाचे वाहू मी, धावणाऱ्या जगासंगे असाच किती धावू मी आरंभ बिंदू जन्म असे अन् अंतिम बिंदू मृत्यू असे हो, या बिंदूंना जोडणारा आयुष्याचा खेळ असे हो अंतिम बिंदू गाठण्यापूर्वी खर्‍या सुखाला शोधील जो, आभासी सुखास हरवूनी या खेळामध्ये जिंकेल तो परंतु जाळे भावनांचे त्यातच ओझे अपेक्षांचे, पूर्तता त्यांची करता करता गणित संपते आयुष्याचे मोहमायेची दुनिया सारी मानव पडला अडकूनी यातच, सुख समजूनी जे जे मिळविले दुःख खरे होते हो त्यातच आई वडील बंधू भगिनी नातेवाईक, मित्रमंडळी, पत्नी मुलांसह समाजदेखील आस बाळगून असती सगळी सुखी सर्वांना करता करता खरे सुख विसरूनीच गेलो, अंतिम बिंदू गाठण्यापूर्वी आभासी जगामध्ये हरवूनी गेलो ✒ K. Satish

निधर्मी मैत्री

Image
आठवा कधी तुम्ही मैत्री करताना जात धर्म पाहिला आहे, परधर्माच्या मित्रांसाठी नक्कीच स्वधर्मीयांना भांडला आहे अतूट होती मैत्री तुमची मनापासून, हृदयापासून, क्षणालाही करमत नव्हते तुम्हाला एकमेकांपासून जात वेगळी, धर्म वेगळे पक्ष वेगळे, रंग वेगळे, तरीही जगत होता रे तुम्ही जिवलग मित्र बनून सगळे राज्यकर्त्यांना बघवत नाही मैत्री तुमची अशी अतूट, पोळी भाजत नाही त्यांची पाहूनी तुमची एकजूट कावा त्यांचा ओळखा तुम्ही बनू नका धर्मांध असे रे, सत्तेसाठी धडपड त्यांची तुमचे कुणाला भान नसे रे सद्सद्विवेक बुद्धी जागवून विचार स्वतःच करा नेटका, एकसंघ राहूनी सगळे द्या दुष्ट शक्तींना झटका जात पंथ अन् धर्म विसरूनी भारतीय तुम्ही बना आता रे, माणुसकीला धर्म मानूनी सुंदर बनवा या जगता रे... ✒ K. Satish